कुदळवाडीतील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

कुदळवाडीतील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

चिखली, ता. ६ : कुदळवाडी येथील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी परिसरात स्वच्छ भारत योजनेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चिखली येथील यात्रा सुरू होत असून परिसरात त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बालघरे वस्ती ते सेक्टर १६ राजे शिवाजीनगर, कुदळवाडी जाधववाडी मधला रस्ता, भैरवनाथनगर परिसरातील अंतर्गत रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले पाहावयास मिळत आहेत. चार-चार दिवस येथील कचऱ्याचे ढीग उचलले जात नाहीत. स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
याबाबत श्री शक्ती महिला संघ संस्थेचे अध्यक्ष सिंधू किवळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. शहरातील इतर रस्ते स्वच्छ करून, स्वच्छता अभियानाचे महापालिका बक्षिस घेते. मात्र उपनगरातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुदळवाडीत सुक्या आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. तरी याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी अजय चार्थ्यांकर म्हणाले, ‘‘याबाबत आरोग्य निरीक्षकांना सूचना देऊन परिसरात स्वच्छता करण्यात येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com