Sat, Sept 30, 2023

साने चौकातील कठडा हटविला
साने चौकातील कठडा हटविला
Published on : 30 May 2023, 10:42 am
चिखली, ता. ३० : साने चौक येथे वाहतुकीस अडथळा ठरणारा कठडा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविल्याने चौकातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या वतीने साने चौक येथे मेहेत्रे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध खांब उभारून त्या भोवती मोठा कठडा बांधण्यात आला होता. या कठड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या भागातून चिखली-आकुर्डी रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांबरोबरच तळवडे सॉफ्टवेअर पार्क आणि एमआयडीसीतील कामगार या रस्त्याचा उपयोग करतात. मात्र, साने चौक येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या कठड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे यांनी महापालिका व तळवडे वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्यातील पोल व कठडा हटविण्याची विनंती केली होती.