वाहतूकीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंटची नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूकीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंटची नियमावली
वाहतूकीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंटची नियमावली

वाहतूकीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंटची नियमावली

sakal_logo
By

देहूरोड ता. १२ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व देहूरोड पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने देहूरोड बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे तसेच बाजारपेठेत होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी नियमावली तयार करणेत आली आहे. ही नियमावली येत्या १७ तारखेपासून अमलात येईल.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बोर्ड प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या नियमावलीअंतर्गत, महात्मा गांधी शाळेमध्ये चारचाकी व दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. हातगाडीधारकांना मंगल कार्यालयाच्या पुढील रिकाम्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. मुख्य बाजारपेठेत व रस्त्याच्या बाजूला हातगाड्यांना मज्जाव करण्यात येईल. बाजारपेठेतील दुकानाभोवती पट्टे मारून जागा निश्चित करण्यात येईल. पट्ट्यांच्या बाहेर दुकान वाढवण्यात मनाई असेल. तीनआसनी रिक्षा फक्त ठरविलेल्या रिक्षा थांब्यांवरच उभ्या राहतील. वाहतूक पोलिस रिक्षा इतरत्र उभ्या राहणार नाही, याची दक्षता घेणार आहेत. माल वाहतूक वाहने, जडवाहने यांना बाजारपेठेत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यत मज्जाव असेल.