देहू टोपलीत रांगोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू टोपलीत रांगोळी
देहू टोपलीत रांगोळी

देहू टोपलीत रांगोळी

sakal_logo
By

देहू, ता.२३ : सध्या दिवाळी साजरी होत आहे. घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या गृहिणींप्रमाणे देहूतील देऊळवाड्यात दररोज एक आजी भल्या पहाटे आपल्या घमेल्यात नाना रंगांची रांगोळी घेऊन प्रत्येक मंदिरापुढे काढत आहेत.
एकीकडे मंदिरात काकडा आणि दिवाळी पहाट कार्यक्रम दररोज होत आहेत. या काळात देऊळवाड्यात आजींनी काढलेल्या सप्तरंगाच्या रांगोळीमुळे डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
याबाबत आजी कमळ साळुंखे म्हणाल्या, ‘‘मी मूळची लातूरची आहे. गेल्या तीन वर्षांपासून देऊळवाड्यात राहते. येथेच तुकोबांची सेवा करते. सण असो अगर नसो मी दररोज रांगोळी काढत असते. मनाला समाधान मिळते.’’