रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी शेख
रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी शेख

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी शेख

sakal_logo
By

देहूरोड, ता. २ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी अब्दुल जलील शेख यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अॅड.अयुब शेख यांनी नियुक्ती पत्र दिले. अब्दुल जलील शेख यांनी अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच वस्तू व सेवा कर विभागाचे माजी अधीक्षक म्हणून काम केले आहे. शेख हे मुंबई येथे अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) मध्ये कार्यरत होते. त्यांनी महसूल, गुप्तचर संचालनालय मध्येही यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे सीमा शुल्क विभागातही ते काही वर्षे कार्यरत होते.