देहूला अभियंता नियुक्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूला अभियंता नियुक्तीची मागणी
देहूला अभियंता नियुक्तीची मागणी

देहूला अभियंता नियुक्तीची मागणी

sakal_logo
By

देहू, ता. ५ : देहू नगरपंचायत स्थापन होऊन दोन वर्ष झाले, तरी अद्याप नगरपंचायतला कायम स्वरुपी बांधकाम अभियंता नाही. त्यामुळे शासनाने त्वरित अभियंता नेमावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. आळंदीतील अभियंताकडे देहू नगरपंचायतचा तात्पुरता पदभार सोपविला आहे. त्यामुळे काही दिवस आळंदी आणि दोन-तीन दिवस देहू असे काम सद्यचा अभियंता करत आहे. सद्यपरिस्थितीत देहूमध्ये अनेक कामे सुरू आहेत. या कामांवर लक्ष देणाऱ्या अभियंत्याची नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.