सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

sakal_logo
By

देहूरोड, ता. ७ : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे ३५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळालेला नाही. तसेच काही सेवानिवृत्त कर्मचारी यांना ग्रज्युटी रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी (ता.७) देहूरोड कँटोन्मेंट कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारने जीएसटी लागू केली. त्यामुळे जकात उत्पन्न बोर्ड बंद झाले. त्यातच वाहन प्रवेश कर बंद झाला. यातून बोर्डाचे ७० ते ८० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न बुडाले. त्यामुळे बोर्डाची तिजोरी रिकामी झाली. दैनंदिन खर्च आणि कर्मचारी यांना पगार देण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यातच सातव्या वेतन आयोग लागू झाला. २०१६ पासून अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी वसंतराव झेंडे, नरेंद महाजनी, सी. बी. गायकवाड, श्रीरंग सावंत, जी.एस.माळी, एस.जी.बोत्रे, रोह्गस जगुराम उपस्थित होते.
बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने म्हणाले, ‘‘सरकारकडून जीएसटीचे सुमारे ९० कोटी येणे बाकी आहेत. लष्कराच्या विविध विभागाचे सेवाशुल्कांचे तीनशे कोटी मिळालेले नाहीत. या डिसेंबर अखेर दहा कोटी रुपये सरकारकडे मागितले आहेत. सरकारने ते मंजूर केल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरक दिला जाईल.’’
सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष वसंतराव झेंडे म्हणाले, ‘‘२०१६ पासून कर्मचारी यांना लाभ मिळालेला नाही. २०१६ पासून ५० कामगारांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला नाही. सर्व सेवानिवृत्त कर्मचारीऱ्यांना नऊ कोटी रुपयांचा फरक मिळाला नाही. अनेक कामगार वाट पाहून आज हयात नाहीत. त्यांची कुटुंबे नाजूक परिस्थितीत आहेत. आज आम्हाला डिसेंबर अखेर लाभ मिळेल असे आश्वासन बोर्ड प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात येत आहे.