देहूरोड येथे गुरुनानक देव जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड येथे गुरुनानक देव 
जयंती उत्साहात
देहूरोड येथे गुरुनानक देव जयंती उत्साहात

देहूरोड येथे गुरुनानक देव जयंती उत्साहात

sakal_logo
By

देहूरोड, ता. ८ : देहूरोड येथे विविध संस्था आणि संघटनाच्या वतीने गुरुनानक देव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देहूरोड येथील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुद्वारा श्री सिंग सभाच्या वतीने तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयंतीच्या दिवशी सकाळी अखंड पाठ, कीर्तन सेवेचे आयोजन केले होते. दुपारी अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील ग्यानी बल देवसिंग यांचे कथा वाचन झाले. अहंकार सोडून निरंकारची पूजा करा, सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं म्हणा, तीर्थ करणे, नाम जप करा, असा संदेश ग्यानी बलदेवसिंग यांनी दिला. तसेच महाप्रसादाचेही आयोजन केले होते. गुरुद्वारा श्री सिंग सभेचे महाप्रबंधक गुरुमितसिंग रत्तू आणि इतर पदाधिकारी यांनी आयोजन केले होते.