देहूरोड कन्टोंमेट बोर्डाच्या सभेत, आर्थिक समस्यांवर तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड कन्टोंमेट बोर्डाच्या सभेत, आर्थिक समस्यांवर तोडगा
देहूरोड कन्टोंमेट बोर्डाच्या सभेत, आर्थिक समस्यांवर तोडगा

देहूरोड कन्टोंमेट बोर्डाच्या सभेत, आर्थिक समस्यांवर तोडगा

sakal_logo
By

देहूरोड, ता. १५ : देहूरोड कन्टोंमेट बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कन्टोंमेट बोर्ड प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१४) झालेल्या बोर्डाच्या विशेष सभेत बोर्डाच्या भाडेतत्वावर दिलेल्या मिळकतीचे थकीत भाडे वसूल करणे, कँटीन भाड्याने देणे आणि एम.बी.कॅम्प जवळील मैदान भाड्याने देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. ब्रिगेडियर अमन कटोच सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सध्या बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. सेवानिवृत्त कर्मचारी यांनी नुकतेच पैसे मिळावे म्हणून आंदोलन केले. तसेच जीएसटीचे पैसे केंद्र सरकारने दिले नाहीत. त्यामुळे बोर्ड आर्थिक संकटात आहेत. एम.बी. कम्प मैदानात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पुढील जून महिनापर्यंत स्पर्धा होतात. सभेत आयोजकांना दिवसाला एक हजार रुपये भाडे देण्याचा विषय मांडण्यात आला. मात्र कैलास पानसरे यांनी आक्षेप घेतला. भाडे कमी करण्याची मागणी केली. तसेच इतर व्यावसायिकांना दीड हजार रुपये भाडे मैदानासाठी द्यावे लागणार आहे. लाखो रुपये खर्च करून बोर्ड प्रशासनाने 5 वर्षापूर्वी कँटीन बांधले. मात्र त्यासाठी वीस हजार रुपये पेक्षा जास्त भाडेतत्वावर देण्याचे ठरवले होते परंतु, भाडे जास्त असल्यामुळे कोणीही कँटीन घेतले नाही. आता मात्र भाडे दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती अधिक्षक राजन सावंत यांनी दिली. तसेच बोर्डाचे अनेक गाळे भाडेतत्वावर दिलेले आहेत. त्याचे थकीत भाडे वसूल करण्यात येणार आहेत. आमदार निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. त्यातील काही कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नामनिर्देशित सदस्य ॲड. कैलास पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, राजन सावंत उपस्थित होते.