देहू पवार वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू पवार वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
देहू पवार वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

देहू पवार वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

देहू ,ता. १३ : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शन, रांगोळी स्पर्धाचे आयोजन केले होते. आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग मांडले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. प्राचार्य सुनिल लाडके, तसेच विद्यार्थिनी योगासने सादर केली. राजेंद्र घाडगे म्हणाले, ‘‘आदरणीय पवार साहेब हे युवकांना प्रेरणास्थान आहेत. विज्ञान प्रदर्शनातून उद्‍याचे शास्त्रज्ञ तयार होतील.’’ देहू येथे तळवडे हॉस्पिटल आणि कांतीलाल काळोखे यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी उपप्राचार्य के.डी. गायकर, सुधीर रोकडे, सिंधू मोरे व उपस्थित होते.