अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर देहूत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर देहूत कारवाई
अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर देहूत कारवाई

अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर देहूत कारवाई

sakal_logo
By

देहूरोड, ता. २७: मुकाईचौक, देहूरोड, रावेत या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीवर पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने मंगळवारी (ता.२७) कारवाई केली. या कारवाईमध्ये नऊ वाहनांमधून ४ लाख २० हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांच्या नेतृत्वाखाली गावकामगार तलाठी अतुल गीते, कविता पाठक, एस.बी.बच्छाव, महसूल सहायक महेश गायकवाड, तुषार सोनवणे व ज्ञानेश्वर गोठे हे सहभागी झाले होते.