Thur, June 1, 2023

देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड निवडणूक;
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड निवडणूक; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
Published on : 19 February 2023, 9:37 am
देहूरोड, ता. १९ : देशातील ६२ कँटोन्मेंट बोर्डपैकी ५७ कँटोन्मेंट बोर्डचे निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी जाहीर झाल्या आहेत. शनिवारी निवडणूक संदर्भात गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. मात्र यात देहूरोडसह अन्य चार कॅन्टोन्मेंट बोर्डची नावे नसल्याने विविध पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
याबाबत देहूरोड कँटोन्मेंट बोर्डचे अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले, ५७ बोर्डचे नोटिफिकेशन प्राप्त झाले आहे. येत्या ३० एप्रिलला निवडणुका होणार आहेत. देहूरोड, दिल्ली, अंबाला व इतर दोन अशा पाच कॅन्टोन्मेंट बोर्डचे नाव यादीत नाही. दरम्यान गेली दोन वर्षे बोर्डचे निवडणूक झाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करत होते. मात्र देहूरोड कँटोन्मेंट बोर्डचे नाव नोटिफिकेशन मध्ये नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.