Wed, May 31, 2023

देहू परिसरामध्ये
शिवजयंती उत्साहात
देहू परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात
Published on : 19 February 2023, 1:41 am
देहूरोड, ता. १९ ः देहू आणि देहूरोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध संस्था आणि राजकीय पक्षांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
देहूरोड बाजार पेठेतील ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शिवस्मारक समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ॲड. कृष्णा दाभोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. रमेश जाधव, गुरमित सिंह रत्तू व इतर उपस्थित होते.
तसेच गणपती मंदिर, पोर्टर चाळ, स्वामी विवेकानंद रिक्षा स्टँड येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपक सायसर, राकेश सोलंकी, भरत भूम्बंक, राकेश वाल्मीकी, संदीप बालघरे, व्यंकटेश कोली, उमाशंकर सिंग, कांतिलाल पारेख आदी उपस्थित होते.