देहूमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
देहूमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

देहूमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

देहू, ता. २८ : येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात झाले. ‘माझा महाराष्ट्र...माझा अभिमान’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील‌ सांस्कृतिक विविधता आपल्या बहारदार नृत्य शैलीतून सादर केली. पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी भूपाळी, वासुदेव पासून शेतकरी, आदिवासी, कोळी, गोंधळ, मंगळागौर, पालखी सोहळ्याची परंपरा जोपासत दहीहंडी, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा या मराठमोळ्या सणांचा नृत्यातून सादरी करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला. प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. कविता अय्यर, एन. बी. जाधव, बी. एस. पठारे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, राजाभाऊ गोलांडे, दत्तात्रेय अत्रे उपस्थित होते. वैभवी डोळस व आराध्य माने यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व माने याने आभार मानले.