देहू बीज सोहळा शासकीय आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू बीज सोहळा शासकीय आढावा बैठक
देहू बीज सोहळा शासकीय आढावा बैठक

देहू बीज सोहळा शासकीय आढावा बैठक

sakal_logo
By

देहू, ता. ८ : संत तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त लाखो भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी सूचनांची अंमल बजावणी करावी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी देहूत केले. तसेच पाऊस सुरु झाल्यास वारकरी यांच्या निवासासाठी शाळेतील वर्ग खोली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्यापासून बीज सोहळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भक्त निवास येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी संजय असवले बोलत होते. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, तहसीलदार गीता गायकवाड, पोलिस उपायुक्त काका साहेब डोहे, प्रशांत ढमाले व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सोहळ्याच्या एक दिवस आधी देहूत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. देहुरोडकडून येणारी वाहतूक माळवाडी येथील लष्कराच्या मैदानात असणार आहे. मुख्य देऊळवाड़ा ते वैकुंठ मंदिरापर्यंत बरेकेठीग असणार आहे. त्यामुळे गर्दी वर नियत्रंण राहणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक बंब वाहन, विविध ठिकाणी रुग्णासाठी ओपीडी सोय करण्यात आली आहे. तेरा पिण्याचे पाणी पुरवठा करणारे टँकर. इंद्रायणीच्या तीरावर जीवरक्षक उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.