देहू नगरपरिषद

समित्यांच्या सभापतींची
बिनविरोध निवड जाहीर

देहू नगरपरिषद समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड जाहीर

देहू, ता. ५ ः देहू नगरपंचायतीच्या विविध समितींच्या सभापतींची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी पूनम काळोखे यांची निवड झाली तर आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी शीतल हगवणे यांची निवड झाली.
हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव उपस्थित होते. त्यात ही निवड करण्यात आली.
देहू नगरपंचायतमध्ये १७ पैकी १७ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे विविध समित्यांची निवडणूक बिनविरोध झाल्या.
बांधकाम समितीच्या सभापतीपदी पूनम काळोखे यांची बिनविरोध निवड झाली. पूजा काळोखे, ज्योती टिळेकर, मयूर शिवशरण, योगेश काळोखे यांची सदस्यपदी निवड झाली.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पोर्णिमा परदेशी यांची पुन्हा निवड झाली. प्रियांका मोरे, सपना मोरे, रसिका काळोखे सदस्य आहेत.
आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी शीतल हगवणे यांची निवड झाली. सपना मोरे, योगेश परंडवाल, प्रियांका मोरे, मीना कुराडे यांची सदस्यपदी निवड झाली.
पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी सुधीर काळोखे यांची सभापतीपदी निवड झाली. आदित्य टिळेकर, पूजा दिवटे, मीना कुरा डे, ज्योती टिळेकर यांची सदस्यपदी निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com