Sun, May 28, 2023

महिलांसाठी जाहीर केलेल्या
धोरणाचे सासवडमध्ये स्वागत
महिलांसाठी जाहीर केलेल्या धोरणाचे सासवडमध्ये स्वागत
Published on : 12 March 2023, 10:37 am
सासवड शहर, ता. १२ : येथील शिवतीर्थ चौकात दिलीप यादव यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाके वाजून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी मंत्री विजय शिवतारे यांचे स्वागत करण्यात आले. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सूट, आरोग्य विमा, नोकरदार महिलांसाठी व वसतिगृह अशा विविध बाबी जाहीर करण्यात आलेल्या महिला धोरण्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या वेळी साकेत जगताप, अमोल जगताप, महेंद्र जगताप, संतोष जगताप, प्रतीक म्हेत्रे, सचिन जगताप, नदीम इनामदार, गणेश जगताप, अतुल म्ह्स्के, डॉ. राजेश दळवी, अंकुर शिवरकर, कोडीत ग्राम संघाच्या अध्यक्षा अलका बडदे, सेनेच्या बारामती विभागाच्या प्रमुख गीतांजली ढोणे, वैशाली काळे, नीता कटके, धनंजय म्हस्के, हरिभाऊ लोळे आदी उपस्थित होते.