Fri, May 20, 2022

मावळ राष्ट्रवादीच्या
उपाध्यक्षपदी भागवत
मावळ राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी भागवत
Published on : 5 May 2022, 8:52 am
इंदोरी, ता. ५ ः येथील उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भागवत यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांची मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसे लेखी पत्र तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले.
सदर पत्र आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी गणेश खांडगे, विठ्ठल शिंदे, दिलीप
ढोरे, आशिष ढोरे, स्वप्नील शेवकर यांनी अभिनंदन करपण भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भागवत हे मावळ ग्रामीण रोटरी क्लबचे अध्यक्ष असून, माजी उपसरपंच आहेत. पक्षश्रेष्ठी व सहकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पक्षाची ध्येय धोरणे व विचार तळागाळापर्यंत पोचवून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहील, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01173 Txt Pc Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..