
अवकाळी पावसामुळे मावळात पेरण्या खोळंबल्या
इंदोरी, ता. १२ ः मागील आठवड्यापासून उन्हाळी बाजरी काढणीस सुरुवात झाली. परंतु अचानक मावळात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी काढणी तूर्त थांबवली आहे.
मावळात विशेषतः: पूर्व भागातील इंदोरी, माळवाडी, वराळे, नाणोली, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, कोटेश्वरवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी तसेच पवन मावळातील पूर्व पट्ट्यात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजरी पेरणी केली जाते. ८०-९० दिवसांत पीक काढणीस येते. सामान्यपणे खोडवा उसाची तोडणी झाल्यानंतर त्याच क्षेत्राची मशागत करून तेथेच बाजरी पीक घेतात. काही शेतकरी खास वेगळ्या क्षेत्रात पीक घेतात. ऊस क्षेत्र वाढल्याने मावळात रब्बी ज्वारी क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. उन्हाळी बाजरीकडे शेतकरी वळला.
मावळात पायोनियर, निर्मल, महिको या वाणांना अधिक पसंती आहे. एकरी सुमारे तीन किलो. बियाणे लागते. तर उत्पादन साधारणपणे एकरी २० क्विंटल मिळते. काढणीनंतर २-३ दिवस अळशीवरच कणसे वाळली म्हणजे मळणी केली जाते. मळणी यंत्रावरच मळणी करतात.
जर काढणीनंतर पाऊस झाला तर बाजरी पिकाचे मोठे नुकसान होते. जमिनीवर कणसे पडलेली असल्याने कोंब
फुतात. कणसांना काजळी चढते.
बाजरीची ताटे (सरमड) काळी पडतात. असे निवृत्ती भोसले, नारायण मराठे, सुदाम भसे, गणेश दाभाडे यांनी सांगितले.
तर अलिकडे उन्हाळी बाजरी पीक क्षेत्र कमी होण्याचे कारण सांगताना महेश उर्फ हरी भसे म्हणाले की, बाजरी
धान्याचे बाजारभावाची पातळी १८ रुपये किलोच्या पुढे जात नाही. शिवाय वैरणीसाठी सरमडाचा ही उपयोग होत
नाही. जनावरे ही वैरण खात नाहीत. त्यामुळे हे पीक परवडत नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01176 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..