इंदोरीच्या उपसरपंचपदी संगीता राऊत बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीच्या उपसरपंचपदी संगीता राऊत बिनविरोध
इंदोरीच्या उपसरपंचपदी संगीता राऊत बिनविरोध

इंदोरीच्या उपसरपंचपदी संगीता राऊत बिनविरोध

sakal_logo
By

इंदोरी, ता. १९ ः येथील विद्यमान उपसरपंच मंगल ढोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक
घेण्यात आली. एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संगीता दीपक राऊत यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच कीर्ती पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी काम पाहिले.
निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन सभा पार पडली. यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते
नवनिर्वाचित उपसरपंच संगीता राऊत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल शिंदे, प्रशांत ढोरे, जगन्नाथ शेवकर, जयंत राऊत, अण्णासाहेब भेगडे, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे यांनी मनोगत केले.
सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक संदीप काशीद यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नाटक यांनी, तर आभार रमेश घोजगे यांनी मानले.
---------------------------------
इंदोरी ः नवनिर्वाचित उपसरपंच संगीता राऊत यांचा सत्कार करताना माजी आमदार दिगंबर भेगडे व अन्य मान्यवर.