
सांगुर्डी येथे खरीप हंगामाबाबत प्रशिक्षण
इंदोरी, ता. ३१ : सांगुर्डी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम प्रशिक्षण वर्ग तसेच ग्राम कृषी समितीची पहिली सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत भसे होते. यावेळी उपसरपंच संदीप चव्हाण, ग्रा.पं.सदस्य सोनम भसे, वसंत दौने, योगिता भसे, रेश्मा मराठे, नयना भसे आदी उपस्थित होते.
विभागीय कृषी सहाय्यक गणेश विटे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामविकास आराखडा, खरीप हंगामासाठी मशागत, बियाणे व खते यांचे नियोजन, कृषी विभागाच्या विविध योजना, विहीर पुनर्भरण लाभार्थी निवड, महाडीबीटी विविध लाभार्थी योजना, सोयाबीन उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी प्रकल्प योजना, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना इत्यादी बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. हुमणी अळी नियंत्रणासाठीच्या लाइट ट्रॅपची प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी चंद्रकांत भसे, शांताराम काळे, सुदाम भसे, राजू भसे, अंकुश भसे, नामदेव भोसले, विजय भसे, दिनकर भसे, गणपत भोसले, प्रकाश भसे या शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामसेवक एल.सी. चव्हाण यांनी आभार मानले.सांगुर्डी : पिकांवरील हुमणी अळी नियंत्रक लाइट ट्रॅपचे प्रात्यक्षिक दाखवताना गणेश विटे.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01187 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..