
इंदोरीत वर्गखोल्यांचे उद्घाटन
इंदोरी, ता. ३० : येथील प्रगती विद्यालय व आ. ना. काशीद पा. उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने बांधलेल्या चार वर्गखोल्यांचे उद्घाटन नुकतेच पार पडले. निगडी-पुणे रोटरी क्लब, व्हिटेस्को टेक्नॉलाॅजिज इंडिया कंपनी आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे काम करण्यात आले आहे.
वर्गखोल्यांचे उद्घाटन व्हिटेस्को कंपनीचे व्यवस्थापक अनुराग गर्ग यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे होते.
निगडी रोटरी क्लब अध्यक्ष जगमोहन सिंह, सचिव सुहास ढमाले, संस्था सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार व भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन वर्गखोल्यांची सोय करून दिल्याबद्दल निगडी रोटरी क्लब व व्हिटेस्को कंपनीचे भेगडे यांनी या वेळी आभार मानले.
शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे, महेश शहा, सोनबा गोपाळे, सरपंच कीर्ती पडवळ, उपसरपंच संगीता राऊत, प्रशांत ढोरे, जगन्नाथ शेवकर, दिलीप ढोरे, जयंत राऊत, संदीप काशीद आदी उपस्थित होते. प्रस्ताविक प्राचार्य चंद्रकांत धनवे यांनी केले. सूत्रसंचालन अलका आडकर व लक्ष्मण मखर यांनी केले. सुदाम वाळूंज यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01211 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..