
आषाढी एकादशीनिमित्त भंडारा डोंगरावर भक्तिसोहळा
इंदोरी, ता. ११ ः आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर दोन
दिवस भक्तिमय सोहळा उत्साहात झाला. पहाटे पाचला चिंचवड येथील उद्योजक किरण आहेर व कुटुंबीयांचे हस्ते पांडुरंग व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची अभिषेक व महापूजा पार पडली. सकाळी १० ते १२ या वेळेत मनोहर महाराज ढमाले मामा यांची कीर्तनसेवा घडली.
आहेर यांच्यावतीने आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. रात्री इंदोरी, सुदवडी व जांबवडे भजन जागर सेवा झाली. द्वादशीच्या दिवशी पहाटे महापूजा उद्योजक दिलीप ढोरे व शांताराम कराळे यांच्या हस्ते झाली. सकाळी ९ ते१० जोपाशेठ पवार यांची प्रवचनसेवा झाली व त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी प्रास्ताविक केले. संदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप ढोरे यांनी आभार मानले.
----------------------------------
आषाढी एकादशीनिमित्त भंडारा डोंगरावरील मंदिराची आकर्षक फुलांची सजावट.
फोटो ः 01812
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01217 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..