कुंडमळ्यावरील पर्यटन ठरतेय धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंडमळ्यावरील पर्यटन ठरतेय धोकादायक
कुंडमळ्यावरील पर्यटन ठरतेय धोकादायक

कुंडमळ्यावरील पर्यटन ठरतेय धोकादायक

sakal_logo
By

इंदोरी, ता. २५ ः येथील कुंडमळ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी व वाढते अपघात याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. येथे वाढणारी गर्दी आणि तरुणाची स्टंटबाजी जिवावर बेतत आहे. त्यामुळे येथे तळेगाव व तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून या पर्यटनस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी इंदोरी कुंडमळा ग्रामस्थांनी केली आहे.
बंधाऱ्यामुळे बारा ही महिने तुडुंब भरलेले इंद्रायणी नदीचे पात्र, बंधाऱ्यावरून कोसळणारे पाणी, इंद्रायणीच्या दोन्ही
काठांवरील नयनरम्य दाट झाडी, नदीपात्रातील बदक व पाणकोंबड्यांचे थवे, विविध प्रकारचे पक्षी व त्यांचा मंजूळ
किलबिलाट, बंधाऱ्याचे खाली नदीपात्रातील कुंडजाई मातेचे सुंदर मंदिर व पसरलेला काळा खडक, खडकांमधील खोल खोल घळ्या व विविध आकारांचे रांजण खळगे व नदीपात्रातील पाण्याचे भोवरे पर्यटकांना विशेष आकर्षित करीत आहेत. तसेच हे स्थळ पुणे-मुंबई महामार्ग व
भेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ असल्याने पर्यटकांना सोयीचे वाटते. इथे लोणावळा खंडाळाप्रमाणे पोलिस प्रशासनाचा ससेमिरा नाही की कुठलाही अटकाव नाही. त्यामुळे कुंडमळ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी दिसून येते, अशी प्रतिक्रिया सचिन भेगडे, मनोहर भेगडे, सागर
पवार यांनी व्यक्त केली.
पसरलेला खडक, खाचखळगे यामुळे वाहत्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यात युवा पर्यटकांची स्टंटबाजी व
सेल्फी फोटो काढण्याचा हव्यास या कारणांमुळे इथे अपघात वाढत आहेत. अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. या महिन्यात नदी प्रवाहात पडण्याचे सहा अपघात घडले. पैकी पाच जणांना स्थानिक युवक, वन्य जीव रक्षक पथक व शिवदुर्ग लोणावळा पथकाचे प्रयत्नाने जीवदान मिळाले तर साक्षी वंजारे या युवतीला प्राण गमवावा लागला. पर्यटकांचा स्थानिकांना खूप त्रास होतो. सुरक्षेच्या द्दष्टीने करण्यात येणाऱ्या सूचनांना पर्यटक जुमानत नाहीत. त्यांना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्तच हवा. पाण्यात पडून अपघात घडल्यास पोलिसांना खबर देणे व जीव धोक्यात घालून पाण्यात पडलेल्यास वाचविण्यासाठी कर्तव्य व माणुसकी धर्मातून स्थानिक युवक प्रयत्न करतात, असे
दत्तात्रेय भेगडे, जनार्दन भेगडे, संजय भेगडे, काळूराम पवार यांनी सांगितले.

‘‘पावसाळ्यात पूर आल्यानंतर अपघातांची संख्या वाढते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. निदान या कालावधीत तरी चोख पोलिस बंदोबस्त असायला हवा.’’
- दिनेश चव्हाण, सदस्य, इंदोरी ग्रामपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01225 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top