
इंदोरी ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर
इंदोरी, ता. ३० ः इंदोरी ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे. त्याचे आरक्षण अधिकारी दीपक राक्षे (पशुधन वैद्यकीय अधिकारी पं. स. मावळ) यांनी इंदोरी ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर केले. राक्षे यांना ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी व गाव कामगार तलाठी स्वाती शिंदे यांनी सहकार्य केले.
गावची लोकसंख्या १०,४४८ असून एकूण प्रभाग ६ आहेत. तर निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या १७ आहेत. पैकी नऊ महिला असणार आहेत. अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग २, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण महिला ५ ,अशी एकूण १७ सदस्य संख्या राहील.
यावेळी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग १ - सदस्यसंख्या - २. अनु.जमाती महिला व सर्वसाधारण महिला.
प्रभाग २ - सदस्यसंख्या - ३. अनु.जाती,नागरिकांचा मागास
प्रवर्ग महिला, व सर्वसाधारण महिला.
प्रभाग ३ - सदस्यसंख्या-३. सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण, व सर्वसाधारण
प्रभाग ४ - सदस्यसंख्या -३. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण
प्रभाग ५ - सदस्यसंख्या-३. नागरिकांचा मागास प्रवर्ग,
सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ६)सदस्यसंख्या -३. नागरिकांचा मागास प्रवर्ग,
अनु.जाती महिला व सर्वसाधारण महिला.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01229 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..