कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 
मार्गदर्शन शिबिर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर

sakal_logo
By

सांगुर्डी ः कांदा उत्पादनासाठी रांगडा हंगाम अधिक सोयीचा व हिताचा असल्याने शेतकऱ्यांनी या हंगामात कांदा उत्पादन घ्यावे, असे आवाहन कृषी सहायक गणेश विटे यांनी सांगुर्डी येथे शेतकरी शिबिरात मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत भसे होते.
कांदा उत्पादनासाठी खरीप व रब्बी हंगामापेक्षा रांगडा हंगाम सोईस्कर आहे. कारण खरिपात अनेक शेतकऱ्यांना
पाण्याअभावी लागवड करता येत नाही. तर ज्यांच्या विहिरीतील पाणी जेमतेम फेब्रुवारी, मार्च पर्यंत पुरते त्यामुळे रब्बी (उन्हाळ) कांदा करता येत नसल्याने रांगडा हंगामात कांदा लागवड करावी, असे विटे यांनी स्पष्ट केले.
रांगडा हंगामासाठी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात बी पेरणी करावी. म्हणजे रोपांची पुनर्लागवड आक्टोबर, नोहेंबर मध्ये करता येईल व कांदा काढणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये होईल. गरज भासल्यास निदान ३-४ महिने कांद्याची
साठवण करता येईल. मात्र, योग्य जातीचे बियाणाची निवड करायला हवी. स्वत: घरी अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बी वापरून या हंगामात लागवड केली तर डेंगळे व जोड कांद्याचे प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून रांगडा हंगामासाठी बसवंत ७८०, एन २-४-१, ॲग्रीफाऊंड लाईटरेड, फुले समर्थ, भीमा सुपर, भीमा रेड, भीमा राज, भीमा शक्ती, भीमा शुभ्रा या सुधारित जातींची लागवड करावी, असे विटे यांनी रांगडा हंगामी कांदा पिकाबाबत मार्गदर्शन केले.
-----------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01249 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..