इंदोरीत जल्लोषात गणरायाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीत जल्लोषात गणरायाचे स्वागत
इंदोरीत जल्लोषात गणरायाचे स्वागत

इंदोरीत जल्लोषात गणरायाचे स्वागत

sakal_logo
By

इंदोरी, ता. १ ः येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी भरपावसात ढोल, लेझीम, टाळमृदंग व डीजेच्या गजरात मिरवणुकीने गणरायाची मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळी १० पासून ४ वाजेपर्यंत घरगुती गणपती बसविण्याची लगबग सुरू होती तर सायंकाळी ५ नंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर पावसात मिरवणुका काढून प्राणप्रतिष्ठा करून मंडळांच्या अध्यक्षांचे हस्ते पूजा व आरती करण्यात आली.
धर्मनाथ मित्र मंडळ, ज्योतिबा मित्र मंडळ व प्रगतीनगर मित्र मंडळ यांनी मिरवणुकीसाठी डीजे तर हनुमान मित्र
मंडळ, तोलानी मित्र मंडळ, कॅडबरी कामगार मंडळ, संत तुकारामनगर मित्र मंडळ यांनी टाळमृदंगाच्या गजरात
मिरवणूक काढली. तर शिवशक्ती मित्र मंडळ, कडजाई मित्र मंडळ, कानिफनाथनगर मित्र मंडळ, जय संतोषीमाता
मित्र मंडळ, इंद्रायणीनगर मित्र मंडळ, इंद्रेश्वर मित्र मंडळ व साईनगर मित्र मंडळ यांनी ढोल, लेझीम या पारंपरिक
वाद्याच्या गजरात मिरवणुका काढल्या.
यावर्षी प्रगती मित्र मंडळाने बालजत्रा तर हनुमान मित्र मंडळाने रक्तदान शिबिर आणि कडजाई मित्र मंडळाने
प्रश्नमंजूषा स्पर्धा व विविध कलागुण स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे संबंधित अध्यक्षांनी सांगितले.
----------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01251 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..