इंदोरीत सामाजिक उपक्रमांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीत सामाजिक उपक्रमांवर भर
इंदोरीत सामाजिक उपक्रमांवर भर

इंदोरीत सामाजिक उपक्रमांवर भर

sakal_logo
By

इंदोरी, ता. ७ ः कोरोनामुळे दोन वर्षे घातले गेलेले निर्बंध यावर्षी नसल्याने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवात दांडगा उत्साह दिसून येत आहे. इंदोरीमध्ये सुमारे १५ सार्वजनिक
गणेश मंडळे आहेत. परंतू यावर्षी सर्वच मंडळांनी देखाव्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईवर भर दिला आहे.
प्रमुख मंडळांनी मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन आकर्षक बक्षीसे दिली गेली. तर काही मंडळांनी मनोरंजनांचे उपक्रम राबविले. या वर्षी आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे अनेक मुस्लीम युवकांनी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेऊन स्वहस्ते आरत्या केल्या.
हनुमान मित्र मंडळाने साधी सजावट केली असून दररोज सांयकाळी परिसरांतील भजन सेवेचे आयोजन केले. एक दिवस पिंपरी-चिंचवड रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान
शिबिराचे आयोजन केले. तर ग्रामदैवत कडजादेवी मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, तीन दिवस पाचवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धेचे तसेच वैयक्तिक कलागुण दर्शविण्यासाठी ही संधी दिली. धर्मनाथ मित्र मंडळाने साधी सजावट केलेली असून, विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस दोन गटांत नृत्य स्पर्धा घेतल्या. शिवशक्ती मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले. तसेच चव्हाण वाड्यातील ज्योतिबा मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली असून एक दिवस आर. सी. राठोड यांचा सर्कससह एंटरटेनिंग या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच प्रगतीनगर मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, तीन दिवसांसाठी मुलांसाठी मोफत बालजत्रेचे आयोजन केले. तोलानी शिक्षण संस्था मित्र मंडळ, कॅडबरी कामगार मित्र मंडळ, संत तुकारामनगर मित्र मंडळ, कानिफनाथनगर मित्र मंडळ, इंद्रेश्वर मित्र मंडळ, जय संतोषी माता मित्र मंडळ, साईनगर मित्र मंडळ व इंद्रायणीनगर मित्र मंडळ या सार्वजनिक गणेश मंडळांनी साधी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली आहे.
इंदोरीतील गणेशोत्सव दहा दिवशीय अनंत चतुर्दशी पर्यंत असतो. विसर्जन मिरवणुकीवर सर्वच मंडळांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

इंदोरी ः शिवशक्ती मित्र मंडळ
२)प्रगतीनगर मित्र मंडळ
३)हनुमान मित्र मंडळ
४)ज्योतिबा मित्र मंडळ
५)कडजाई मित्र मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01255 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..