नृत्य स्पर्धेत वेदिका नाटक व श्रावणी गायकवाड प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृत्य स्पर्धेत वेदिका नाटक 
व श्रावणी गायकवाड प्रथम
नृत्य स्पर्धेत वेदिका नाटक व श्रावणी गायकवाड प्रथम

नृत्य स्पर्धेत वेदिका नाटक व श्रावणी गायकवाड प्रथम

sakal_logo
By

इंदोरी, ता. १४ ः येथील धर्मनाथ मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत लहान गटात वेदिका नाटक तर मोठ्या गटात श्रावणी गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला.
तर ग्रुप नृत्य लहान गटात जि.प. प्राथमिक शाळा इंदोरी व मोठ्या गटात प्रगती विद्यालय या संघांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्‍घाटन माजी आदर्श सरपंच संदीप काशीद यांचे हस्ते तर पुरस्कार वितरण माजी उपसरपंच दिलीप ढोरे व प्रशांत भागवत यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष निवृत्ती हिंगे होते. वैयक्तिक व सांघिक मधील दोन गटांसाठी क्रमांक एक ते तीनसाठी अनुक्रमे चार हजार, तीन हजार व दोन हजार रुपये मंडळाच्या वतीने तर प्रत्येकी ट्रॉफी संदीप काशीद यांचे वतीने देण्यात आली.
कार्यक्रमास जगन्नाथ शेवकर, जयंत राऊत उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत माजी चेअरमन अंकुश ढोरे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नाटक व संस्कार चव्हाण यांनी
केले. तर आभार आशिष ढोरे यांनी मानले.
--------------+---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01260 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..