कान्हेवाडी उपसरपंचपदी स्वाती येवले बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हेवाडी उपसरपंचपदी 
स्वाती येवले बिनविरोध
कान्हेवाडी उपसरपंचपदी स्वाती येवले बिनविरोध

कान्हेवाडी उपसरपंचपदी स्वाती येवले बिनविरोध

sakal_logo
By

इंदोरी, ता. १९ ः आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता. खेड) येथील उपसरपंचपदी स्वाती प्रभाकर येवले यांची बिनविरोध निवड झाली. ठरल्याप्रमाणे उपसरपंच सुवर्णा ढोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच भाऊसाहेब पवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत निवडणूक घेण्यात आली. ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने स्वाती येवले यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रा.पं. सदस्य राहुल येवले, अनिल कडलक, सुवर्णा ढोरे, ओमेश्वरी ढोरे, आरती खैरे उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती येवले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी त्यांनी ग्रामस्थ व सहकाऱ्यांचे आभार मानून म्हटले की, सर्व सहकारी व श्रेष्ठींचा विश्वास व सहकार्य यांच्या जोरावर या आदर्श गावाचा विकास अधिक गतीने करण्याचा प्रयत्न राहील.
-----------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01264 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..