इंदोरी ग्रामस्थांकडून वसुबारस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरी ग्रामस्थांकडून वसुबारस उत्साहात
इंदोरी ग्रामस्थांकडून वसुबारस उत्साहात

इंदोरी ग्रामस्थांकडून वसुबारस उत्साहात

sakal_logo
By

इंदोरी, ता.२२ ः इंदोरी ग्रामस्थांचे वतीने हनुमान मंदिर प्रांगणात वसुबारस निमित्त शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिकरित्या प्रातिनिधिक स्वरूपात
दोन गोमातांचे पूजन करुन दीपावली उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.
फटाक्यांची आतिषबाजी व पारंपारिक वाद्यांच्या निनादात गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत गोमातांना मिरवणुकीने हनुमान मंदिर प्रांगणात आणण्यात आले. ग्रामस्थांनी गोमातांचे भक्तिभावाने पूजन केले. वर्षभरातील सर्व जाती-धर्मांचे सण व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यात सर्व ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामविकास कार्यात असणारी एकी याबाबत विठ्ठल शिंदे व अंकुश ढोरे यांनी मनोगतातून प्रशंसा केली. तर पुणे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोसेवा प्रमुख विजय शिंदे यांनी मानवी जीवनात असलेले गोमातेचे अनमोल स्थान याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी
गोमातांचे जीवापाड रक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी दिलीप ढोरे, संदीप काशिद, दामोदर शिंदे, पोपटराव ढोरे, बबनराव ढोरे, जगन्नाथ नाटक, सुभाष ढोरे, अनिकेत शिंदे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. माजी उपसरपंच अंकुश ढोरे यांनी प्रास्ताविक
केले. संदीप काशिद यांनी सूत्रसंचालन केले तर विजय शिंदे यांनी आभार मानले.