बिनविरोध निवडणुकीची परंपरा इंदोरीत राखली जाणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिनविरोध निवडणुकीची परंपरा 
इंदोरीत राखली जाणार का?
बिनविरोध निवडणुकीची परंपरा इंदोरीत राखली जाणार का?

बिनविरोध निवडणुकीची परंपरा इंदोरीत राखली जाणार का?

sakal_logo
By

इंदोरी, ता. १७ ः मावळातील नऊ गावांच्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका १८ डिसेंबर रोजी होत आहेत. त्यात इंदोरी
या मोठ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. इंदोरी ग्रामपंचायत १९५२ मध्ये अस्तित्वात आली. आतापर्यंत
१३ पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या आहेत. त्यापैकी ९ पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. २००२ ते
२००७ या पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत पूर्णपणे महिलांच्या ताब्यात देऊन, आगळा वेगळा इतिहास घडविला. परंतु यंदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखली जाईल काय, या चर्चेला उधाण आले आहे. सर्वपक्षीय ज्येष्ठ मंडळी बिनविरोध निवडणुकीसाठी नेहमीच प्रयत्न करीत आली आहेत. मात्र, यावर्षी इच्छुकांची संख्या अधिक दिसत आहे. त्यात युवकांची
संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असा अनुभव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दिसून आला. तोच अनुभव भाजप व आरपीआय युती सभेतही आला. इच्छुकांची नाराजी परवडली पण निवडणुकीतून निर्माण होणारी नाराजी व कटुता गावाच्या विकासावर परिणाम करते व
सर्वसामान्य कुटुंबे नाहक भरडली जातात, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जयंत राऊत व
भाजपचे शहराध्यक्ष जगन्नाथ शेवकर यांनी सांगितले.
------------
असा आहे निवडणूक कार्यक्रम
इंदोरीचे सरपंदपद ओबीसीसाठी आरक्षित आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरअखेर उमेदवारी अर्ज दाखल
करण्यात येईल. ७ डिसेंबरअखेर उमेदवारी माघार घेता येईल. मतदान १८ डिसेंबर रोजी होऊन निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

----------------------------------+