माळेगाव येथील वरसूबाई विद्यालयात दिंडीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव येथील वरसूबाई 
विद्यालयात दिंडीचे आयोजन
माळेगाव येथील वरसूबाई विद्यालयात दिंडीचे आयोजन

माळेगाव येथील वरसूबाई विद्यालयात दिंडीचे आयोजन

sakal_logo
By

इंदोरी, ता. २० ः मावळातील माळेगाव येथील वरसूबाई माध्यमिक विद्यालयात कार्तिकी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले.
ग्रामस्थ वारकरी अरुण मोरमारे यांचे हस्ते आणि मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे व मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन होऊन दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बहुसंख्य मुलामुलींनी वारकरी पेहराव परिधान केला होता. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष व टाळमृदंगाचे गजरात दिंडी
मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात समारोप करण्यात आला. रस्त्यात जागोजागी महिलांनी दिंडीचे स्वागत करून फुलांची उधळण केली. दिंडीच्या माध्यमातून गावातील वातावरण भक्तीमय झाले होते. दिंडीद्वारे भक्ती बरोबरच ग्रामस्थांना विज्ञान व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
मंदिरात नामदेव गाभणे व बाळासाहेब गायकवाड यांनी विविध अभंगांचे गायन केले. तर शंकरराव सुपे यांनी
एकादशी व ज्ञानेश्वर संजीवन समाधी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी सोनू मोरमारे, महादू सुपे, तुषार पवार, सुनील गायकवाड सह ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडीचे संयोजन रघुनाथ सातकर व अशोक सुपे यांनी केले होते.