इंदोरीतील कुंडमळा पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीतील कुंडमळा पुलाचा 
प्रस्ताव सादर करण्याचा आदेश
इंदोरीतील कुंडमळा पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश

इंदोरीतील कुंडमळा पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश

sakal_logo
By

इंदोरी, ता. ३१ ः कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्ते विकास सचिवांना दिला आहे. सुमारे दहा-बारा गावांचे दळणवळणाच्या सोयीसाठी मावळ तालुका भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली. यावेळी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
सध्याचा वाहतुकीसाठी असणारा साकव पूल ३० वर्षापूर्वी स्व. खासदार अण्णा जोशी यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला आहे. या पुलावरून शेतीमाल, दुग्ध पदार्थांची वाहतूक तसेच विद्यार्थी व कामगार या साकव पुलाचा वापर करतात. परंतु हा साकव पूल असल्याने केवळ पायी चालणारे व दुचाकी वरूनच ये-जा होते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हा पूल अपुरा व अडचणीचा आहे. शिवाय जुना झाला असल्याने ठिकठिकाणी कठडे तुटल्याने धोक्याचा झाला आहे. तसेच इथे जागृत कुंडदेवी मातेचे मंदिर आहे. दर्शनासाठी
वर्षभर भाविकांची गर्दी असते.
सर्व अडचणी नवीन पुलामुळेच सुटतील. शिवाय नवीन पुलामुळे तळेगाव-चाकण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व परिसरातील लोक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून शासनाकडे नवीन पुलाची मागणी करीत आहेत. आता लवकरच नवीन पूल होईल अशी खात्री वाटत आहे, असे रवींद्र भेगडे म्हणाले.