टॅंकरच्या चाकाखाली चिरडून युवक जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅंकरच्या चाकाखाली चिरडून 
युवक जागीच ठार
टॅंकरच्या चाकाखाली चिरडून युवक जागीच ठार

टॅंकरच्या चाकाखाली चिरडून युवक जागीच ठार

sakal_logo
By

इंदोरी, ता. २ ः रस्त्याची दुरवस्था व टॅंकर चालकाच्या चुकीमुळे दुचाकीला टॅंकरची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला युवक जागीच ठार झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्याने एका मजुराचा बळी घेतला.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना इंदोरी-सांगुर्डी रस्त्यावर इंदोरी हद्दीतील रामकृष्ण मठाजवळ गुरुवार (ता. २) रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. फिर्यादी राजेश निशाद (वय ३८, रा. डॉ. उनकुले चाळीसमोर, तळेगाव दाभाडे) हे आपले मित्र बादशहाआलम रफीकअहमद अन्सारी (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) यांना आपल्या दुचाकीवर बसवून सांगुर्डीस रंगकाम करण्यासाठी चालले होते. रामकृष्ण मठाजवळ पुढे चाललेल्या टॅंकरला उजव्या बाजूने
ओलांडून पुढे जात असताना अज्ञात टॅंकर चालकाने वळण्यासाठी इंडिकेटर न लावता अचानक वेगाने उजव्या बाजूस टॅंकर वळविला व मोटार सायकलला टॅंकरची धडक बसली. परिणामी मोटारसायकल चालक राजेश निशाद उडून बाजूला पडले व मागे बसलेले बादशहाआलम अन्सारी मोटार सायकलसह टॅंकरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. जखमी निशाद यांना विलास भसे यांनी देहूगाव येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रसंगी अनोळखी टॅंकरचालक अपघात स्थळी टॅंकर सोडून फरार झाला आहे.