सुदुंबरेतील आधार सेवा शिबिरास चांगला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुदुंबरेतील आधार सेवा शिबिरास चांगला प्रतिसाद
सुदुंबरेतील आधार सेवा शिबिरास चांगला प्रतिसाद

सुदुंबरेतील आधार सेवा शिबिरास चांगला प्रतिसाद

sakal_logo
By

इंदोरी. ता. २१ ः सुदुंबरे येथे ग्रामपंचायत व आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने व उमा शेळके यांच्या प्रयत्नातून तीन आठवड्याचे आधार सेवा शिबिर झाले. शिबिराचा एक हजार १२४ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्‍घाटन माजी आदर्श सरपंच माणिक गाडे यांच्या हस्ते व उमा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आधार कार्ड सेवा केंद्राच्या व्यवस्थापिका सपना वामन व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच जालिंदर गाडे, ताराचंद गाडे, विश्वनाथ अंबोले उपस्थित होते.