सिद्धांत फार्मसीमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धांत फार्मसीमध्ये 
प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन
सिद्धांत फार्मसीमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन

सिद्धांत फार्मसीमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन

sakal_logo
By

इंदोरी, ता. २५ ः शहीद दिनानिमित्त सुदुंबरे (मावळ) येथील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी (वूमन) आणि सिद्धांत कॉलेज ऑफ डी फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्पर्धेत १८ संघ सहभागी झाले होते. उद्‍घाटन मेघालयच्या म. गांधी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सागर मांजरे यांच्या हस्ते आणि प्राचार्य बी. व्ही. मठदेवरु व प्राचार्य सागर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास वाढतो, असे मांजरे यांनी मनोगतातून सांगितले. परिक्षक म्हणून प्रा. बिंदूराणी राम व प्रा. संध्या लंके यांनी काम पाहिले. सहभागी संघांना प्रमाणपत्रे तर विजेत्या संघांना पुरस्काराचे वाटप विकास कांडेकर व श्वेता मंत्री यांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. राहुल डुंबरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी खेडेकर व शुभदा शिंदे यांनी केले. नियोजन भाग्यश्री पडवळ यांनी केले. आभार श्वेता गायकवाड यांनी मानले.

स्पर्धा निकाल -
प्रथम - वैष्णवी वीर व सोनाली पाटील (सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी, सुदुंबरे)
द्वितीय - माधुरी दीक्षित व ताई पवार (इंद्रायणी फार्मसी कॉलेज, तळेगाव दाभाडे)
तृतीय - भाग्यश्री पदमने व सोनाली बाबर (आर.एम.डी. फार्मसी कॉलेज, चिंचवड)