ज्ञानयज्ञ प्रवचन सोहळ्याचे 
इंदोरीत आयोजन

ज्ञानयज्ञ प्रवचन सोहळ्याचे इंदोरीत आयोजन

इंदोरी, ता. २७ ः हनुमान जन्मोत्सवा निमित्त श्री हनुमान मित्र मंडळ व भजनी मंडळ इंदोरी यांच्यावतीने ३१ मार्च ते ६ एप्रिल अखेर ज्ञानयज्ञ प्रवचन व हरिभजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत हनुमान मंदिरात पहाटे ४ ते ६ काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिभजन, सायं. ६.३०
ते ८ ज्ञानयज्ञ प्रवचन व रात्री १० ते १२ हरिभजन अशा दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मार्च ते ५ एप्रिल अखेर अनुक्रमे तुषार महाराज दळवी (भाजे), महादेव महाराज शिंदे (आळंदी), जयश्री महाराज येवले (पाचाणे), यतीराज महाराज लोहर (दारुंब्रे), दिलीप महाराज खेंगरे (भाजे) व वैभव महाराज गाढवे (राजगुरुनगर) यांच्या प्रवचन सेवेचा लाभ होणार आहे. तर शनिवार १ एप्रिल रोजी
स. ११ वा. स्वहस्त लिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरी वही पूजन रवींद्र महाराज ढोरे यांचे हस्ते होऊन त्यांची प्रवचन सेवा होणार आहे. तर ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते ७ पर्यंत बबन महाराज शेवकर यांचे हनुमान जन्मावर कीर्तन होऊन
त्यांच्या उपस्थितीत हनुमान जन्मसोहळा संपन्न होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com