इंदोरीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता
इंदोरीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

इंदोरीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

sakal_logo
By

इंदोरी, ता. ३० ः महाविष्णूदेव मंदिर व श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता श्रीराम जन्म व कीर्तन सेवेने झाली. महाविष्णू मित्र मंडळाच्या वतीने विष्णू मंदिरात २२ मार्च ते २९ मार्च दरम्यान काकड आरती, भजनसेवा व श्रीराम चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाचे अध्यक्ष रवींद्र महाराज ढोरे यांनी श्रीराम चरित्राचे कथन केले. महाविष्णूदेव मंदिरात गुरुवार (ता.३०) सकाळी ज्ञानेश्वर महाराज निपणे यांचा कीर्तन व श्रीराम जन्म सोहळा उत्साहात झाला. यावेळी बबन महाराज शेवकर, प्रकाश महाराज घुले, महादेव महाराज भुजबळ, मनोहर महाराज ढमाले, दिलीप महाराज भसे, रामदास महाराज मोरे यांची प्रवचन सेवा झाली. तसेच श्रीराम मंदिरात संतोष महाराज काळोखे यांचे रामजन्म कीर्तन झाले. दोन्ही मंदिरांमध्ये रामजन्मानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.