Wed, October 4, 2023

राज्य गुणवत्ता यादीत
आदिती ढोरे तृतीय
राज्य गुणवत्ता यादीत आदिती ढोरे तृतीय
Published on : 28 April 2023, 10:38 am
इंदोरी, ता. २८ ः भारती विद्यापीठ, पुणे यांचे वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या गणित-इंग्रजी बाह्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत इंदोरी येथील प्रगती विद्यालयातील इयत्ता सहावीमध्ये शिकणारी आदिती नवनाथ ढोरे हिने ९७ टक्के गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला.
या निमित्त आदिती ढोरे व मार्गदर्शक शिक्षिका वैजयंती कुल यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्था प्रतिनिधी संजय देशमुख व शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य सुदाम वाळूंज व पर्यवेक्षक राजेंद्र वाजे यांनी मनोगत व्यक्त करून अभिनंदन केले. प्रास्ताविक व स्वागत मच्छिंद्र बारवकर यांनी केले. लक्ष्मण मखर यांनी आभार मानले.