
‘भटकंती’चा वर्धापनदिन भुईकोट किल्ल्यात उत्साहात
इंदोरी, ता. २४ ः भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान, मावळ या संस्थेचा चौथा वर्धापन दिन इंदोरी भुईकोट किल्ल्यात साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. प्रवेशद्वारापासून ग्रामदैवत कडजाईमाता मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कडजाई मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत सरदार वृषाली राजे दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी गोरक्षक
शिवशंकर स्वामी, विनोद साबळे, विजय तिकोने, प्रमोद भोसले, किरण चिमटे आदींनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गड किल्ले संवर्धन करणाऱ्या विविध संस्थांना ऐतिहासिक ग्रंथ देऊन सन्मानित केले. तसेच इंदोरी किल्ल्याचे संवर्धन करण्याच्याद्दृष्टीने करण्यात येणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे वाचन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले.
इंदोरी किल्ल्यावर ३० फुटी भगवा ध्वज लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा संपूर्ण खर्च इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे करणार आहेत.