किवळे, वाल्हेकरवाडीत शाळापूर्व तयारी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळे, वाल्हेकरवाडीत 
शाळापूर्व तयारी मेळावा
किवळे, वाल्हेकरवाडीत शाळापूर्व तयारी मेळावा

किवळे, वाल्हेकरवाडीत शाळापूर्व तयारी मेळावा

sakal_logo
By

किवळे, ता. २८ : महापालिकेच्या येथील शाळा क्र. ९६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला. शाळेतील शिक्षकांनी विविध स्टॉल लावून गणन पूर्व तयारी, अंक ओळख, बौद्धिक विकास, भावनिक विकास व क्षमता यांचे खेळ घेतले. पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे, मुख्याध्यापक सुनंदा अस्वार तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षक, बालवाडीताई व अंगणवाडीताईंनी सहकार्य केले. वाल्हेकरवाडी येथील महापालिकेच्या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व मेळावा उत्साहात पार पडला. उद्घाटन येथील शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती भालके यांनी मेळाव्यात लेझीमद्वारे मुलांचे स्वागत आणि औक्षणही केले, अशी माहिती मुख्याध्यापिका उज्वला ढमढेरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00674 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top