
मामुर्डीत घनदाट झाडांमुळे पक्ष्यांचा विहार
किवळे, ता. १० : मामुर्डीतील थॉमस कॉलनीत चारही बाजूने सिमेंटचे जंगल झालेले असताना येथील संतोष राऊत यांनी शेती टिकवून ठेवली आहे. फळ झाडांमुळे पक्षांच्या दानापाण्याची चांगलीच सोय झाली आहे. याठिकाणी घनदाट झाडांमुळे टिटवी, पावशा अन् मोरांचा मुक्त विहार, संचार पाहायला मिळत आहे.
संतोष राऊत व माजी नगरसेवक संजय राऊत यांनी शेती व्यवसाय टिकवून ठेवला आहे. दोन गुंठ्यांत गावरान मूग लावला आहे. साडेचार एकरमध्ये बांधावर ठिकठिकाणी जांभूळ, चिंच, आंबा, रामफळ, पेरू ही झाडे असून आंब्याला वर्षातून तीनदा फळे लागतात. एकूण दोनशे झाडे लावली होती. पैकी १५० झाडांचे सध्या जंगल अस्तित्वात आहे. यात नारळांची तब्बल शंभर झाडे आहेत. केवळ पाच फूट खोल विहीर असून बारा महिने पाणी असते. झाडांसाठी ठिबकद्वारे पाणी दिले जाते, असे संतोष राऊत यांनी सांगितले.
पक्ष्यांच्या आवाजामुळे निसर्ग समृद्धतेत वाढ
याठिकाणी झाडांचे जादा प्रमाण, त्यास असलेली वेगवेगळी १८ प्रकारची फळे, जवळच विहिरीमुळे दानापाण्याची चांगली सोय असल्याने टिटवी, पावशा अन् मोरांचा विहार रोज पहावयास मिळत आहे. टिटवीच्या रोजच्या आवाजामुळे याठिकाणी निसर्ग समृद्धतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00686 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..