
दापोडी वाहतूक दळणवळण झोनिंग रद्द करण्याची मागणी
किवळे, ता. १२ : दापोडी ते बेगडेवाडी वाढीव प्रारूप विकास योजनेतील वाहतुक दळणवळण झोनिंग रद्द करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भोसले म्हणाले की, पालिकेत किवळे समाविष्ट झाल्यानंतर प्रारूप विकास योजनेतील नकाशात पुणे-मुंबई रेल्वे हद्दीनंतर दापोडी ते बेगडेवाडीपर्यंत २५ मीटर रूंद रेल्वेकरीता वाहतुक दळणवळण झोनिंग प्रस्तावित केले आहे. दापोडी ते बेगडेवाडीपर्यंत रेल्वे हद्दीनंतर बांधकामे झाली असून, जागा उपलब्ध नाही. रेल्वे विभागाने त्यांची हद्द कायम करून संरक्षक भिंत रावेत हद्दीपर्यंत बांधली आहे.
रेल्वे हद्दीनंतर किवळे येथील एमबी कॅम्प ते जुनवणे विटभट्टीपर्यंत पालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करून वृक्षारोपण केले आहे. राजारामनगर ते रावेत हद्दीपर्यंत १३४ मीटरचा ३० ते ४० फूट रस्ता तयार केल्यास वाहतूक सुरळीत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
---------------------------
राजारामनगर ,अरूंद गावपादण रस्त्यावरील वाहतुक कोंडीचे चित्र.
Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00697 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..