सुधारित बातमी/डांबरीकरण वेगात मात्र दर्जा असमाधानकारक ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित बातमी/डांबरीकरण वेगात मात्र दर्जा असमाधानकारक ?
सुधारित बातमी/डांबरीकरण वेगात मात्र दर्जा असमाधानकारक ?

सुधारित बातमी/डांबरीकरण वेगात मात्र दर्जा असमाधानकारक ?

sakal_logo
By

किवळे, रावेत, मामुर्डीतील डांबरीकरण वादात

ठेकेदाराकडून काम पुन्हा करून घेणार असल्याचे ब प्रभाग स्थापत्यचे स्पष्टीकरण

किवळे, ता. २२ ः किवळे, रावेत, मामुर्डीत डांबरीकरण वेगात सुरू आहे. मात्र, या कामाचा दर्जा असमाधानकारक असून, ते दर्जात्मक व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
‘ब’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गतच्या किवळे येथील मुकाई मंदिर ते मुकाई चौक दरम्यान खासगी वाहिनीच्या खोदाईनंतर फक्त भराव टाकून सपाट केले गेल्याने साईड पट्ट्या निसरड्या झाल्या आहेत. याबाबत ‘सकाळ’मध्ये नुकतीच छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध झाली होती. नंतर याठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, दर्जात्मक कामाचा अभाव दिसत आहे. कुठे उंच तर कुठे सखल असे डांबरीकरण झाले आहे.
मुकाई चौक ते रावेत दरम्यानही वाहिनीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी ओबडधोबड डांबरीकरण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे डांबरीकरण काही ठिकाणी नागमोडी दिसत असून, ठिकठिकाणी असलेल्या उंच-सखल पणामुळे स्मार्ट सिटीतील हा बीआरटी रस्ता असतानाही वाहनचालकांना आपण बैलगाडीतून जात असल्याचा अनुभव येत आहे.
मामुर्डी येथील साईनगर भागातील वीर बाबा मंदिर ते येथील जिम दरम्यान महापालिकेने डांबरीकरण केले आहे. मात्र याठिकाणी सुद्धा डांबरीकरणात उंच-सखलपणा दिसत असून, मार्गात पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी चेंबर न करता पूर्ण डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवल्यावर पुन्हा रस्त्याची अल्पावधीत दुरावस्था होईल. त्यामुळे एकंदरीत सर्व ठिकाणचे डांबरीकरण दर्जात्मक होण्याच्या दृष्टीने स्थापत्य अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

डांबरीकरण कामाची पाहणी केली आहे. जिथे जिथे काम दर्जात्मक नाही, त्याठिकाणचे डांबरीकरण संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा करून घेणार आहोत. याबाबत उप अभियंता राजेंद्र इंगळे यांच्याशी चर्चा झाली आहे.
प्रशांत पाटील, स्थापत्य अभियंता, ब प्रभाग)

करदात्यांच्या पैशातून डांबरीकरणाची कामे केली जातात. एकदा काम सुरू केल्यानंतर ते दर्जात्मकच व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा डांबरीकरण करून करदात्यांच्या अधिक पैशाची उधळपट्टी नको.
दिलीप राऊत, उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड जिल्हा भाजप

रस्त्याच्या कामाला दर्जा नाही. दोनच दिवसांपूर्वी रस्ता उखडला आहे. साईनगर येथील जिमलगत ६० फुटी रस्त्यावरील चेंबर डांबरीकरणात बुजून गेले आहे. पाणी गळती झाल्यावर रस्ता पुन्हा खराब होणार असून, योग्य उपाययोजना करावी.
अमरसिंग हिरे, सामाजिक कार्यकर्ते
फोटो ः 01417

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00758 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top