‘कातळे वस्ती येथे बससेवा तातडीने सुरू करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कातळे वस्ती येथे 
बससेवा तातडीने सुरू करा’
‘कातळे वस्ती येथे बससेवा तातडीने सुरू करा’

‘कातळे वस्ती येथे बससेवा तातडीने सुरू करा’

sakal_logo
By

किवळे, ता. २५ : किवळे येथे कातळे वस्ती मार्गे पीएमपीएलची बससेवा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गे तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

किवळे पालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने गेल्या २५ वर्षात परिसराचा झपाट्याने नागरी विस्तार झाला आहे. कातळेवस्ती येथील हभप कैलास कातळे म्हणाले, ‘‘सध्या किवळे मुकाई चौकातील टर्मिनन्समध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून बस येतात. काही बसच्या निगडी ते किवळे गावठाण अशा फेऱ्या होतात. ही बस निगडी, देहूरोड, मुकाई चौक मार्गे कोतवालनगर येथून किवळे गावात येते. येताना संबंधित भागातील स्टॉप घेत ही बस किवळे गावठाणात पोहचते. जाताना ही बस कातळेवस्ती, समीर लॉन्स मार्गे नेल्यास नव्याने विकसित झालेल्या भागातील प्रवाशांची चांगली सोय होईल. पीएमपीएलचे उत्पन्नही वाढेल. यात नोकरदार, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे. त्यामुळे या मागणीचा पीएमपीएलने गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी कातळेवस्ती आणि लगतच्या नव्याने विकसित झालेल्या गृहरचना सोसायट्यांमधील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, पीएमपीएलच्या पब्लिक रिलेशन अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00764 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..