पालिकेकडून पुतळा उभारताना इतिहासाचा अभ्यास व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेकडून पुतळा उभारताना 
इतिहासाचा अभ्यास व्हावा
पालिकेकडून पुतळा उभारताना इतिहासाचा अभ्यास व्हावा

पालिकेकडून पुतळा उभारताना इतिहासाचा अभ्यास व्हावा

sakal_logo
By

वाचक पत्र


पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील किवळे मुकाई चौक येथील एक्सहायवे ब्रिजजवळ महापालिकेने एक मावळ्याचा पुतळा उभारला आहे. उद्‍घाटन केले नाही. हा पुतळ्याचे निरीक्षण केले असता, असे निदर्शनास आले आहे की, पुतळ्याच्या डाव्या हातात तलवार दिसत आहे. माझ्या माहिती प्रमाणे इतिहासात पाहिले असता प्रत्येक सैनिकांच्या उजव्या हातात तलवार असते. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी वर्गाबरोबर चर्चा केली असता असमाधान कारक उत्तरे मिळत आहे. याबाबत खंत वाटते अधिकारी, मूर्तिकार यांनी इतिहासाची तरी माहिती घ्यावी. पुतळा बसवायचा म्हणून बसवू नये, संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करावा काल्पनिक संकल्पना करून सैनिकांचा अपमान करू नये. याबाबत प्रभागातील माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व सर्वसामान्य नागरिकांनी मुकाई चौक, किवळे येथे समक्ष जाऊन पाहणी करावी जर माझे याबाबत चुकत असेल तर मार्गदर्शन करावे अथवा महापालिकेस जाब विचारावा.
- श्याम भोसले, अध्यक्ष, युवा आधार संस्था महाराष्ट्र राज्य (राजारामनगर, किवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00765 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top