
मन खराब असेल तर गळ्यात मायेचा फास तेजग्यान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचे मत
किवळे, ता. २० ः मन खराब असेल तर गळ्यात मायेचा फास राहणारच. मायेत आयुष्य काढायचं नाही तर त्यातून बाहेर पडायचे आहे, असे विचार तेजग्यान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी व्यक्त केले.
तेजग्यान फाउंडेशनच्या सणसनगर नांदोशीगाव येथील मनन आश्रमातील शिबिरात सरश्री यांनी
मार्गदर्शन केले.
मनन आश्रमाची पवित्र भूमी, डोंगरावरील धुक्याची चादर, आजूबाजूची हिरवळ, सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज असलेला आश्रम, भक्तांचा संघ आणि आपल्या गुरूंचे - सरश्रींचे प्रत्यक्ष दर्शन...त्याचबरोबर संदेश श्रवणाने, सर्व खोजी आनंदोत्सवात तल्लीन झाले होते.
खोजींनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सखोल मार्गदर्शन प्राप्त केले. जुलै ते डिसेंबर या महिन्यात कोणत्या कार्य योजनांवर कार्य करायचं आहे आणि कोणतं इंटेन्शन घ्यायचं आहे, याविषयी सरश्री यांच्याकडून जाणून घेतलं.
सरश्री म्हणाले, ‘‘माहितीच्या मोजमापावर चुकीची माहिती नसतेच, योग्य माहिती योग्य वेळेला मिळणे गरजेचे आहे. भक्तीच्या वाटेवर नित्य सजगतेमध्ये रहा. भक्ताने नेहमी भगवंतात विलीन राहिले पाहिजे.’’
यावेळी इंद्रधनुष विजेता गोस्वामी तुलसीदास संतुलित भक्ती रहस्य या पुस्तकाचे प्रकाशन सरश्री यांच्या हस्ते करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00801 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..