‘बीएमसीसी महाविद्यालयावर बेकायदा प्रवेशाबाबत कारवाई करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बीएमसीसी महाविद्यालयावर 
बेकायदा प्रवेशाबाबत कारवाई करा’
‘बीएमसीसी महाविद्यालयावर बेकायदा प्रवेशाबाबत कारवाई करा’

‘बीएमसीसी महाविद्यालयावर बेकायदा प्रवेशाबाबत कारवाई करा’

sakal_logo
By

किवळे, ता. १८ : बीएमसीसी महाविद्यालयाने प्रथम वर्ष बी कॉम आणि बीबीए प्रवेश अर्हतेला तिलांजली देऊन केलेल्या बेकायदा प्रवेशाविरोधात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडे कारवाईची मागणी केली आहे.
बीएमसीसी महाविद्यालयावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुरेश खुर्पे, प्रदेश काँग्रेस लीगल सेलचे सचिव ॲड. फैयाज शेख, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास अग्निहोत्री, वंचित आघाडीचे अतुल झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर मांढरे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या विषयांकित कोर्सेससाठी प्रवेश देताना बारावीच्या गुणांचा विचार न करता दहावीच्या गुणांवर प्रवेश देऊन ही प्रवेश प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चांगल्या गुणांनी आवश्यक अहर्तेसह बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या अहर्तेला डावलल्याने बारावीच्या परीक्षेचा उपयोगच काय, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी उपकुलगुरू यांनी सत्यता तपासून कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00802 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top