राऊतनगर, आझादनगरला विजेचा लपंडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतनगर, आझादनगरला 
विजेचा लपंडाव
राऊतनगर, आझादनगरला विजेचा लपंडाव

राऊतनगर, आझादनगरला विजेचा लपंडाव

sakal_logo
By

किवळे, ता. ११ : मामुर्डी भागातील राऊतनगर आणि आझादनगरला गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत महावितरणच्या रावेत कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क साधूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. राऊतनगर आणि आझादनगरमध्ये सोमवारी आणि मंगळवारी रात्री लाइट नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते अतुल राऊत म्हणाले, महावितरण शाखेत तक्रार केल्यानंतर येथील तीन फेज पैकी एक फेज बंद पडल्याचे समोर आले. त्यामुळे या बंद फेजवरील राऊतनगर, आझादनगर या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्या फेजवरून लाइट चालू करून दिली आहे. मात्र या फेजवरील अतिरिक्त दाबामुळे पाण्याच्या मोटारी चालू होत नाहीत. त्यामुळे कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
विजेच्या लपंडावामुळे घरातील पंखे बंद असतात. दुसरीकडे पावसाळी पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. परिसरातील अनेक नागरिक महावितरणच्या दुरुस्तीसेवा गाडीवरील दूरध्वनीवर फोन करतात. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून फोन उचलला जात नाही. याबाबत महावितरणच्या निगडी प्राधिकरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन महावितरणच्या रावेत कार्यालयास ताकीद द्यावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

हायटेंशन सदोष केबल सदोष दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. पुरवठा लवकरात-लवकर पूर्ववत होईल.
- मनोज पुरोहित, वरिष्ठ अभियंता, रावेत

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00847 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..